Sakal future

क्‍लीअर फंड्‌सची म्युच्युअल विनामोबदला गुंतवणूक

क्‍लीअर फंड्‌सने प्रीमियम स्मार्ट पोर्टफोलिओ सेवा सुरू केली असून, गुंतवणूकदारांना थेट म्युच्युअल फंडात कोणतेही कमिशन न देता गुंतवणूक करता येणार आहे. कागदपत्रांच्या क्‍लिष्ट प्रक्रियेविना गुंतवणूकदारांना ऑनलाईन पद्धतीने पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत अकाऊंटची नोंदणीची सुविधा पोर्टलवर सुरू केली आहे. थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने क्‍लीअर फंड्‌सच्या गुंतवणूकदारांना वर्षाकाठी एक टक्‍क्‍यापर्यंतचे छुपे कमिशनची बचत करता येणार आहे.